*कोंकण एक्सप्रेस*
*कनेडी येथे सनातनतर्फे ४ जानेवारीला जाहीर प्रवचन*
*कणकवली :प्रतिनिधी*
तालुक्यातील कनेडी येथे सनातन संस्थेच्यावतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर जाहीर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.कनेडीतील समाधी महापुरूष सभागृहात ४ जानेवारी रोजी सायंकाळी ३.३० वाजता हे प्रवचन होणार आहे.
सध्याच्या जीवनात माणसाला अनेक ताणतणावांनी घेरले आहे. साधना केल्यास यावर मात करून आनंदी होता येते.यासंदर्भात या प्रवचनातून मार्गदर्शन केले जाणार आहे.त्यासाठी या प्रवचनाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा,असे आवाहन सनातन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.