*कोंकण एक्सप्रेस*
*मडुरा व शेर्ले येथे काजू बागांचे सर्वेक्षण*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण,सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) योजनेअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील कृषि विभाग सावंतवाडी, बांदा मंडळ यांच्या कार्यक्षेत्रातील मडुरा व शेर्ले या गावातील काजू बागांना दिलेल्या सर्वेक्षण भेटीदरम्यान प्रादेशिक फळ संशोधन केंद्र,वेंगुर्ला येथील डॉ.गोपाळ गोळवणकर संशोधन सहयोगी हॉर्टसॅप प्रकल्प, श्री. अझमुद्दीन सरगुरू कृषि पर्यवेक्षक, श्रीम.मनाली परब कृषी पर्यवेक्षक, श्रीम.पल्लवी सावंत कृषी सहाय्यक मडुरा,श्रीम.श्वेता बेलगुंदकर कृषी सहाय्यक शेर्ले व शेतकरी उपस्थित होते.
मडुरा व शेर्ले या दोन गावातील प्रत्येकी २ अशा एकूण ४ काजू बागांमध्ये पाहणी केले असता मोहोरलेल्या अवस्थेत दिसून आले. बागा स्वच्छ असून ढेकण्या किडीसाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही याची १० मिली/ली व ढगाळ हवामान असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम १० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यास सूचित केले. रोठा काजूच्या रोठा किडीसाठी प्राथमिक अवस्थेत करावयाच्या उपाययोजना करण्यास उद्युक्त केले.शेतकर्यांना बागेची स्वच्छता व नियमित सर्वेक्षण याविषयी महत्व पटवून दिले.
शास्त्रज्ञ व कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी यांनी काजू बागेत वारंवार येणार्या समस्या यावर सखोल चर्चा केली.प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकर्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली यांनी शिफारस केलेले आंबा व काजू मोहोर संरक्षण वेळापत्रक शेतकर्यांना वितरित करण्यात आले.