कणकवली तालुका पेन्शनर असो,वार्षिक सर्वसाधारण सभा अन स्नेहसंमेलन संपन्न

कणकवली तालुका पेन्शनर असो,वार्षिक सर्वसाधारण सभा अन स्नेहसंमेलन संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली तालुका पेन्शनर असो,वार्षिक सर्वसाधारण सभा अन स्नेहसंमेलन संपन्न*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली तालुका पेन्शनर असो,सिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.कणकवलीचे तहसीलदार मा.श्री दीक्षांत देशपांडे, यांच्या शुभहस्ते उदघाटन सोहोळा संपन्न झाला.त्यानंतर व्यासपीठावर अध्यक्ष श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी सर्वश्री दीक्षांत देशपांडे तहसीलदार कणकवली,चिंदरकर ट्रेझरी ऑफिसर,जिल्हा प्रतिनिधी मनोहर सरमलकर,सदस्य मोहन सावंत,राजस रेगे,प्रमोद लिमये,श्रद्धा कदम,सचिव विलास चव्हाण,सहसचिव सुगंधा देवरुखकर,ट्रेझरर सिद्धार्थ तांबे,सर्वश्री डी पी तानावडे,घोणे,पाटकर,वंजारी,सुरेखा महाजन,अन इतरांचे पुष्प सुमनांनी हार्दिक स्वागत करणेत आले.

कणकवली तालुका पेन्शनर असो अध्यक्ष श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी आपले प्रास्ताविकात संपुर्ण वर्षांचा आढावा घेतांना जिल्हा परिषद सिंधुदूर्ग,पंचायत समिती कणकवली येथील पेन्शनर अदालत मध्ये पेन्शन विषयक मांडलेल्या समस्या, धरणे,आंदोलने यांचा उहापोह केला.पेन्शनर भवनमधील वर्षभरात केलेल्या सुविधांबाबत माहिती दिली,पेन्शनरांसाठी टेबल टेनिस,कॅरमबोर्ड, बुद्धिबळ इ सुविधा असलेले सुसज्जीत एकमेव पेन्शनर भवन असलेचे आवर्जून सांगितले अन तालुक्यातील सर्व पेन्शनरानी सभासद होणेबाबत आवाहन केले.

सचिव श्री विलास चव्हाण यांनी इतिवृत्ताचे, सन 23-24 जमाखर्च।चे,24-25 अंदाजपत्रकाचे वाचन केले,त्यास सर्वानुमते मंजुरी देणेत आली.उदघाटक मा दीक्षांत देशपांडे तहसीलदार कणकवली यांनी पेन्शन हा पेन्शनरांचा हक्क असलेने प्रतिपादन करून पेन्शन अदालत हा पेन्शनरांचे प्रश्न सोडविणेचा उत्तम पर्याय असलेने नमूद करून भविष्यात काही समस्या निर्माण झालेस सहकार्य करणेची अभिवचन दिले.

श्री चिंदरकर ट्रेझरी ऑफिसर यांनी पेन्शनर यांचे हक्क अन अधिकार,विद्यमान शासन निर्णय,पेन्शनमधील बदल याबाबत सविस्तर माहिती देऊन यापुढे सुद्धा सर्वांना सहकार्य करणेची ग्वाही दिली.श्री प्रमोद लिमये यांनी नेत्रदान,अवयव दान,देहदान यांचे महत्व विषद करून याबाबत पुराणातील दाखले अन साधार पुरावे देऊन मरावे परी किर्तीरूपे उरावे यास स्मरून मरणोत्तर नेत्रदान,अवयवदान,देहदान करणेबाबत सूतोवाच केले.

सौ श्रद्धा कदम यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली शाखा अध्यक्ष यांनी ग्राहक पंचायत कायदा,ग्राहकांचे हक्क अन अधिकार,फसवणूक याबाबत अनेक किस्से सांगून ग्राहकांनी सजकता अन सावध राहण्याबाबत प्रतिपादन केले.श्री मोहन सावंत यांनी कणकवली तालुका असो अध्यक्ष अन कार्यकरिणी बाबत,सभा अन स्नेह संमेलनाचे नेत्रदीपक नियोजनाबाबाबत प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या.श्री राजस रेगे यांनी प्रशासनातील अडचणींबाबत उहापोह करून संघटनेचे महत्व विषद करून मार्गदर्शन केले

जिल्हा प्रतिनिधी श्री मनोहर सरमलकर यांनी पेन्शनराना आरोग्यविषयक व अन्य अनेक अडचणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.इतरांनीही आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी 75 वर्षावरील 20 पेन्शनरांचे शाल,श्रीफळ पुष्पसुमनांनी भव्य सत्कार करणेत आले. तसेच डिसेंबर महिन्यांमधील पेन्शनराचे वाढदिवस साजरे करण्यात आले,श्रीमती सुगंधा देवरुखकर सहसचिव यांनी वर्षभरात अनेक पेन्शनराना सभासद करून घेतलेबाबत त्यांचाही सत्कार करणेत आला.महाराष्ट्र पेन्शनर असो पुणे यांचेकडून दिला जाणारा निवृत्ती सेवा पुरस्कार सन 2024 साठी अध्यक्ष श्री दादा कुडतरकर यांची निवड झालेने त्यांचाही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन हार्दिक सत्कार करणेत आला.

दुपारचे सत्रात स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमात अध्यक्ष श्री सीताराम उर्फ कुडतरकर,लेखक,साहित्यिक श्री महेश काणेकर,ट्रेझरर श्री सिद्धार्थ तांबे,सचिव श्री विलास चव्हाण,श्रीमती वैशाली घाडी यांनी कराओकेवर सुमधुर गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले,सौ रीमा भोसले,सौ सुरेखा महाजन यांनी प्रसंगोचित कविता अन कथांचे उत्कृष्ट सादरीकरण केले,स्नेहसंमेलन सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ रीमा भोसले,श्री सिध्दार्थ तांबे,सौ देवरुखकर यांनी केले.

प्रास्ताविक,अध्यक्षीय भाषण,समारोप,आभार अध्यक्ष श्री दादा कुडतरकर तर संपूर्ण सर्वसाधारण सभा अन इतर कार्यक्रमाचे खुमासदार अन उस्फुर्त सूत्रसंचालन श्री सखाराम सकपाळ यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!