तिलारी घाटात पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात : कारमधील सर्वजण गंभीर जखमी

तिलारी घाटात पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात : कारमधील सर्वजण गंभीर जखमी

*कोंकण एक्सप्रेस*

*तिलारी घाटात पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात : कारमधील सर्वजण गंभीर जखमी*

*दोडामार्ग : प्रतिनिधी*

गोव्यातून घरी परतणाऱ्या कर्नाटक येथील पर्यटकांच्या खासगी कार गाडीला गुरुवारी सकाळी तिलारी घाटात मोठा अपघात झाला.या अपघातात कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले आहे.

गोव्याहून तिलारी घाट मार्गे बेळगाव कर्नाटक गाठत असताना त्यांची कार (के ए 02 एम एन 2906) तिलारी घाटात पोहचली असता एका वळणवर रस्त्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व समोरच्या दगडाला कार आदळली.ही कार आदळल्यानंतर तिथून पुन्हा मागच्या रस्त्यावर जवळपास 100 ते 120 फूट खाली कोसळली. यात कारचेही मोठे नुकसान होत कारमधील सगळेजण गंभीर जखमी झाले आहेत.अपघातानंतर घाट रस्त्यातुन जात असणाऱ्या इतर प्रवाशी वाहनधारकांनी जखमींना मदतकार्य करून उपचारासाठी बेळगाव येथे हलविले.अपघातस्थळी रस्त्यावर मोठा रक्तस्राव झाला आहे.कारचाही चक्काचूर झाला आहे.

या अपघाताबाबत चंदगड पोलीस ठाण्याची संपर्क साधला, अपघाताबाबत नोंद करण्यात आलेली नसून अपघातग्रस्त कार घटनास्थळी एका बाजुला काढून ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!