आरिफ बामणे यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी निलेश राणे मेडिकल प्रतिष्ठानतर्फे आयुष्यभर मेडिकलची मोफत सुविधा

आरिफ बामणे यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी निलेश राणे मेडिकल प्रतिष्ठानतर्फे आयुष्यभर मेडिकलची मोफत सुविधा

*कोंकण एक्सप्रेस*

*आरिफ बामणे यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी निलेश राणे मेडिकल प्रतिष्ठानतर्फे आयुष्यभर मेडिकलची मोफत सुविधा*

*कुडाळ : प्रतिनिधी*

कुडाळ – मालवण चे फायरब्रँड आमदार आदरणीय निलेश साहेब यांनी गेट वे ऑफ इंडिया ला झालेल्या बोट अपघातात तब्बल 35 लोकांचे जीव वाचवणाऱ्या आरिफ आदम बामणे यांना राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपच्या वतीने आयुष्य भर मेडिकल ची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

काही पक्षांनी आरिफ बामणे यांचा वापर फक्त फोटो काढण्यासाठी केला.परंतु आमदार निलेश राणे साहेब यांनी एक कोकणी माणूस या नात्याने आरिफ बामणे यांच्या  संपूर्ण कुटुंबाच्या मेडिकलची  जबाबदारी स्वीकारली.बामणे यांना अंधेरी येथील ऑफिस मध्ये बोलवून त्यांचे स्वागत करून सत्कारही केला.

यावेळी राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुप चे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू,जिल्हाध्यक्ष बिलाल शेख आणि उपाध्यक्ष इम्तियाज अली शेख उपस्थित शेख उपस्थित होते.निलेश राणे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचे चहू बाजूने कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!