जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत फोंडा हायस्कूलला चॅम्पियनशिप

जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत फोंडा हायस्कूलला चॅम्पियनशिप

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत फोंडा हायस्कूलला चॅम्पियनशिप*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन आणि उपरकर शूटिंग अकॅडमी वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेचे आयोजन उपरकर शूटिंग अकॅडमी,कॅम्प,वेंगुर्ला येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये फोंडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनरल चॅम्पियनशिप पटकावली.

या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला, सावंतवाडी, वैभववाडी, कुडाळ, देवगड व कणकवली या तालुक्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा १०मी. ओपन साईट, १० मी. पीप साईट व १० मी. पिस्तूल प्रकारात घेण्यात आली. स्पर्धेच्या बक्षीस समारंभास मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपालिका सागर साळुंखे, गडचिरोली सीमा सुरक्षा दल इन्स्पेक्टर प्रशांत परब, आंतरराष्ट्रीय पंच विक्रम भांगले, सुभेदार पुंडलिक धर्णे, माजी नगराध्यक्ष राजन गिरप तसेच उपरकर शूटिंग अकॅडमी प्रशिक्षक कांचन उपरकर उपस्थित होते.

ओपन साईट पुरुष खुला गटामध्ये प्रथम क्रमांक मयुरेश भोगटे, द्वितीय शुभम साटम, तृतीय गोपाळ हरमलकर, ओपन साईट महिला खुलागटामध्ये प्रथम रूपाली दाभोलकर, द्वितीय प्राची राघव, तृतीय सोनाली चेंदवणकर, ओपन साईट १६ वर्षाखालील मुले

प्रथम सिद्धेश सांडीम, द्वितीय राज परब, तृतीय प्रसाद पाटील, ओपन साईट १६ वर्षाखालील मुली प्रथम स्नेहल राऊळ, द्वितीय वृंदा मोरे, तृतीय सेजल हुबे, खुला गट पिपसाईट पुरुष प्रथम विनय सावंत, द्वितीय रोहन कांबळी, तृतीय चैतन्य तुळसकर, खुला गट पीप साईट महिला प्रथम रूपाली दाभोलकर, द्वितीय पद्मश्री शेट्ये, तृतीय प्रतीक्षा शिरोडकर, १६ वर्षाखालील मुले पीप साईट शिवम चव्हाण प्रथम, गौरव आजगावकर द्वितीय, निलराज सावंत तृतीय, १६ वर्षाखालील गट मुली पीप साईट हंसिका गावडे प्रथम, खुला गट एअर पिस्तूल पुरुष सुभाष बोवलेकर प्रथम, पार्थ देसाई द्वितीय, दत्तप्रसाद आजगावकर तृतीय, खुला गट एअर पिस्तूल महिला स्वाती परब प्रथम, सफिना बागवान द्वितीय, श्रद्धा परब तृतीय, १६ वर्षाखालील मुले एअर पिस्तूल प्रकार शंतनू लाखे प्रथम, ऋतुराज लाखे द्वितीय, यश आंगचेकर तृतीय, १६ वर्षाखालील मुली एअर पिस्तूल प्रकार अन्विता सावंत प्रथम, अवनी भांगले द्वितीय, सई कांबळी तृतीय यांनी क्रमांक पटकावला. यावेळी सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!