*कोंकण एक्सप्रेस*
*रानबांबुळी येथे पैशाच्या वादातून एकाचा खुन : संशयिताला पोलिस कोठडी*
*ओरोस : प्रतिनिधी*
मजुरीच्या पैशाच्या कारणावरून डोकीवर आणि तोंडावर लोखंडी सळीने केलेल्या मारहाणीत मृत्य झाल्या प्रकरणी मूळ पश्चिम बंगाल येथील भीम उर्फ कुट्टू धर्मदास मुजुमदार (वय ३८) याला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अटक केली आहे.त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना २४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८.२५ ते १०.४० या वेळेत घडली होती. रानबांबुळी गावातील सिमरेवाडी येथील बापूजी यशवंत तोरसकर यांच्या मालकीच्या चाळीत ही घटना घडली होती. या चाळीत मयत उत्तम काशिराम सरकार हे राहत होते. सध्या राहणार कुडाळ कुंभारवाडी (मूळ रा. बेलापूर शांतिनिकेतन पश्चिम बंगाल) येथील भीम उर्फ कुहू धर्मदास मुजुमदार हे तेथे आले होते. या दोघांच्यात मजुरीच्या पैशाच्या कारणावरून भांडण झाले. यात संशयित मुजुमदार यांनी मयत उत्तम सरकार यांच्या डोकीवर आणि तोंडावर लोखंडी सळीने मारहाण केली. यात ते बेशुद्ध पडले होते.
त्यानंतर उत्तम सरकार यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना गोवा बांबुळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तीन दिवसांपूर्वी उत्तम सरकार यांचे निधन झाले होते. मारहाण झाल्यानंतर मयत सरकार हे बेशुद्ध असल्याने त्यांचा जबाब घेण्यात आला नव्हता. परंतु त्यांचे निधन झाल्यानंतर १ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.१५ वाजता संशयित मुजुमदार यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत खून करणे आणि पुरावा नष्ट करणे यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारहाण केल्याने संशयित मुजुमदार यांनी मारहाण ठिकाणी पडलेले रक्त पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी भीम मुजुमदार याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे प्रभारी शेखर लवे हे स्वतः करीत आहेत. सायंकाळी अधिकारी लवे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक नागरगोजे, पोलीस नाईक प्रथमेश ओरोसकर यांनी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.