*कोंकण एक्सप्रेस*
*आंबोलीत उद्यापासून हिंदू धर्म परिषद : तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम*
*ना.नितेश राणे यांची विशेष उपस्थिती*
*बांदा :प्रतिनिधी*
गुरुवर्य श्री नवनीतानंद महाराज (श्री मोडक महाराज) स्थापित सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ, आंबोली येथे ३ ते ५ जानेवारी या कालावधीत हिंदू धर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी परमानंद महाराज, अवधूतानंद महाराज, राजेश सावंत, बाळकृष्ण देसाई यांच्यासह साधक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार ३जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. परमानंद महाराज आणि श्री अवधूत आनंद महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा, श्री स्वामी समर्थ प्रतिमा पूजन, श्री नवनीत आनंद महाराज प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन. सकाळी १० वा. परमानंद महाराज यांच्या हस्ते होम हवन, १०.३० वा. राजेश कुंटे कल्याण नर्मदा परिक्रमा यांचे व्याख्यान, दुपारी १२ वा. अभिवक्ते राजेश मुधोळकर यांचे संभाषण व चर्चासत्र, दुपारी २ वा. महाप्रसाद, सायंकाळी ३ वा. समीर लिमये यांचे श्री समर्थ रामदास स्वामी इतिहास कधी हिंदुत्व एक समर्थ दृष्टी याविषयावर व्याख्यान, सायंकाळी ५ वा. जितेंद्र महाराज पार्ट कीर्तन व प्रवचन, ७ वा. नामजप, गुरुसंदेश वाचन. रात्री ८ वा. ह
होम हवन, १०.३० वा. राजेश कुंटे कल्याण नर्मदा परिक्रमा यांचे व्याख्यान, दुपारी १२ वा. अभिवक्ते राजेश मुधोळकर यांचे संभाषण व चर्चासत्र, दुपारी २ वा. महाप्रसाद, सायंकाळी ३ वा. समीर लिमये यांचे श्री समर्थ रामदास स्वामी इतिहास कधी हिंदुत्व एक समर्थ दृष्टी याविषयावर व्याख्यान, सायंकाळी ५ वा. जितेंद्र महाराज पाटील यांचे कीर्तन व प्रवचन, ७ वा. नामजप, गुरुसंदेश वाचन. रात्री ८ वा. ह भ प नवनीत यशवंतराव महाराज यांचे व्याख्यान, ९ वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक मठांचे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
शनिवार ४ रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, सकाळी ७.३० वा. परमानंद महाराज व अवधूतानंद महाराज यांच्या हस्ते होमहवन, सकाळी ८.३० वा. गुरुचरित्र वाचन, १० वा. प्रमुख उपस्थितांचे परमानंद महाराज यांच्या हस्ते स्वागत व गुरुपूजन, सकाळी ११ वा. ह भ प कावेरी मोडक महाराज यांचे प्रवचन, दुपारी १२ वा. ह भ प हेमंत मणेरिकर यांचे प्रवचन, २ वा. महाप्रसाद, ३ वा. ह भ प दिनेश देशमुख यांचे हिंदू संस्कृतीवर व्याख्यान, ४ वा. ह भ प मदन बलकवडे यांचे प्रवचन, सायंकाळी ५ वा. संदीप महाराज मुंबई यांचे कीर्तन, रात्री ७ वा. आरती, नामजप, गुरुसंदेश वाचन, ८ वा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कल्याण, ठाणे मठ, डोंबिवली मठ यांचे विविध प्रकारचे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होतील.
रविवार ५ रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, सकाळी ७ वा. परमानंद महाराज यांच्या हस्ते होमवन, ८ वा. कल्याण येथून येणाऱ्या समर्थांच्या पालखीचे स्वागत, ९ वा. प्रमुख उपस्थितांचे परमानद
समर्थांच्या पालखीचे स्वागत, ९ वा. प्रमुख उपस्थितांचे परमानंद महाराज यांच्या हस्ते स्वागत व गुरुपूजन, ९.३० वा. गुरुचरित्र वाचन, १० वा. सिंधू मित्र सेवा प्रतिष्ठान सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण ठाकरे यांचे व्याख्यान, सकाळी ११ वा. ह भ प देवराज महाराज यांचे कीर्तन. दुपारी १.३० वा. महाप्रसाद, ३ वाजता सांगता समारोह, आरती होईल.
हिंदू धर्म परिषद निमित्त आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून भाविकांनी आशिर्वचन घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.