बीएसएनएल टॉवर बंद : सोनुर्ली गाव ‘नॉट रिचेबल

बीएसएनएल टॉवर बंद : सोनुर्ली गाव ‘नॉट रिचेबल

*कोंकण एक्सप्रेस*

*बीएसएनएल टॉवर बंद : सोनुर्ली गाव ‘नॉट रिचेबल ‘*

*टॉवर तात्काळ सुरु करा : उपसरपंचांसह शिष्टमंडळाची अधिकाऱ्यांकडे मागणी*

*सावंतवाडी : प्रतिनिधी* 

सोनुर्ली व न्हावेली येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर बंद असल्यामुळे परिसरातील ग्राहकांची सेवा खंडित झाली आहे.त्यामुळे सर्वांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या पार्श्वभूमीवर बंद असलेला मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करा,अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची भेट घेत केली.

दरम्यान, केबल तुटल्याने ही समस्या उद्भवली असून गुरुवारी संबंधित यंत्रणा समस्या दूर करुन टॉवर पुनश्च कार्यन्वित करणार असल्याचे आश्वासन बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिले. तर वारंवार केबल तुटण्याचे प्रकार आणि लाईट गेल्यावर नेटवर्क जाण्याचा प्रकार होत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबवा, अशी मागणी ही यावेळी उपस्थितांनी केली.

बीएसएनएलचे मोबाईल टॉवर बंद असल्याने सोनुर्ली आणि न्हावेली हे दोन्ही गाव गेले पाच दिवस नॉट रिचेबल आहेत. याबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही टॉवर सुरु करण्याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने अखेर संतप्त ग्राहकांसह उपसरपंच भरत गावकर यांनी सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गेली पाच दिवस नेटवर्क अभावी गावात समस्या निर्माण झाल्या आहेत. नोकरी व्यवसाय करणारे तसेच शालेय विद्यार्थांना याचा फटका सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच सोनुर्ली गाव श्रीदेवी माऊली देवस्थानामुळे संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भक्त आणि पर्यटक दाखल होत असतात. बऱ्याचदा गावात मोबा

तसेच सोनुर्ली गाव श्रीदेवी माऊली देवस्थानामुळे संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक भक्त आणि पर्यटक दाखल होत असतात. बऱ्याचदा गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने पर्यटक तसेच भाविक भक्तांचा हिरमोड होतो. त्यामुळे तात्काळ नेटवर्क सुरु करण्यात यावे, अशी मागणी उपसरपंच गावकर यांनी केली.तर सोनुर्ली गावातील काही वाड्या या न्हावेली टॉवरच्या क्षेत्रात येतात त्यामुळे दोन्ही टॉवर तात्काळ सुरु होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी ऑप्टिकल केबल तुटल्याने गेले पाच दिवस मोबाईल टॉवर बंद आहेत सदर यंत्रणेकडून उद्या गुरुवारी हे काम मार्गी लावण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यापासून दोन्ही टॉवर कार्यान्वित होणार आहेत. मॅनपावर कमी असल्याने वेळेत कामे होत नाहीत. परंतु ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता प्राधान्याने उद्या दोन्ही टॉवर कार्यान्वित करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

दरम्यान, सोनुर्ली येथील मोबाईल टॉवरला बॅटरी बॅकअप नसल्याने लाईट गेल्यावर टॉवर बंद पडतो त्यासाठी सोलर लाईट सिस्टीम किंवा अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या, अशी मागणी देखील उपस्थित ग्राहकांनी केली. यावेळी सदरचा टॉवर ‘फोर जी’ सेवेमध्ये घेण्यात येणार आहे. तसेच अपग्रेड सिस्टीम मध्ये सोलर सिस्टिम चे काम होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न ही मार्गी लागणार असून त्यासाठी पुनश्च पाठपुरावा केला जाईल असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.यावेळी माजी सरपंच प्रणाली गाड, ग्रामसेवक तन्वी गवस, ग्रामसेवक तथा ग्रामस्थ मुकुंद परब, प्रवीण गाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!