कणकवली महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गायक सलमान अलीच्या कार्यक्रमाने रंगणार

कणकवली महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गायक सलमान अलीच्या कार्यक्रमाने रंगणार

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गायक सलमान अलीच्या कार्यक्रमाने रंगणार* 

*कणकवली :प्रतिनिधी*

उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर ९ ते १२ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे.यानिमित्ताने उद्घाटनादिवशी ९ रोजी सुप्रसिद्ध गायक सलमान अली आणि त्याच्या बँडचा कार्यक्रम होणार आहे,अशी माहिती माजी नगराध्यक्ष,महोत्सवाचे प्रणेते समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली पर्यटन महोत्सवानिमित्त दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम पाहण्याची संधी कणकवली वासीयांना मिळणार आहे.कणकवलीत ९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. भव्य शोभायात्रा, सायंकाळी ६.३० वा. फूड फेस्टिव्हल, रात्री ८ वा. उद्घाटन, ८.३० वा. सुप्रसिद्ध गायक सलमान अली आणि बँडचा कार्यक्रम होणार आहे.

सलमान अली हा २०१८ मधील इंडियन आयडॉलच्या दहाव्या पर्वाचा विजेता आहे. सन २०११ मध्ये सारेगमपा या लिटील चॅम्पस् पर्वाचा उपविजेताही ठरला होता. २०१९ पासून त्याने पार्श्वगायक म्हणून चित्रपट, मालिका आदींना आवाज दिला. सब बढिया है, दबंग – ३ मधील आवारा, सय्योनी आदी गाणी सलमान अली याने गायिली युवाईमध्ये आहेत. प्रचंड लोकप्रिय असलेल्या सलमान अली याच्या उद्घाटनादिवशीच असलेल्या कार्यक्रमामुळे रसिकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

महोत्सवात जानेवारी १० रोजी सायंकाळी ७ वाजता ‘आम्ही कणकवलीकर’ हा २५० स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे. ११ जानेवारी रोजी रात्री ८ वा. रिशी सिंग, नितीन कुमार, सायली कांबळे आदी नामवंत इंडियन आयडॉल गायकांचा कार्यक्रम होणार आहे. रविवार, १२ जानेवारीला महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी नामवंत गायक तसेच सिनेस्टार कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!