कलंबिस्त रस्ताप्रश्नी आंदोलनाचा इशारा

कलंबिस्त रस्ताप्रश्नी आंदोलनाचा इशारा

*कोंकण एक्सप्रेस*

*कलंबिस्त रस्ताप्रश्नी आंदोलनाचा इशारा*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

कलंबिस्त येथील रस्ता पूर्णपणे अर्धवट स्थितीत सोडून ठेकेदाराने पलायन केले आहे.सदर रस्ता डांबरीकरणाचे काम गेल्या पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आले होते.मात्र,सदर काम अर्धवट ठेवण्यात आले आहे.त्यामुळे या रस्त्यावर अपघात घडत आहेत. सदर रस्त्यावर कार्पेट घालावे.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे यांनी येत्या एक जानेवारीला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तर शिवसेनेचे संजय पालकर यांनीही सार्वजनिक बांधकामचे लक्ष वेधले आहे.

रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. परंतु कार्पेट घालण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्ता खडबडीत झाला आहे. त्यामुळे नाराजी आहे. रस्त्याचे ठेकेदार अमेय आरोंदेकर यांनी सांगितले की, १५ जानेवारीनंतर सदर रस्त्याचे कार्पेटचे काम हाती घेण्यात येईल.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर रस्ता हा खडीकरण, डांबरीकरण व रुंदीकरणाचा प्रस्ताव होता. त्यानुसार काम हाती घेण्यात आले होते.मात्र,ठेकेदाराला वारंवार सूचना करूनही कार्पेट टाकले नाही. आता त्यांनी कार्यवाही न केल्यास त्याला दंड करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!