गोपुरी आश्रम येथे ५ जानेवारीला विद्यार्थ्यांसाठी हस्तकला प्रशिक्षण

गोपुरी आश्रम येथे ५ जानेवारीला विद्यार्थ्यांसाठी हस्तकला प्रशिक्षण

*कोंकण एक्सप्रेस*

*गोपुरी आश्रम येथे ५ जानेवारीला विद्यार्थ्यांसाठी हस्तकला प्रशिक्षण*

*कणकवली : प्रतिनिधी*

वागदे येथील गोपुरी आश्रमातर्फे जीवनशिक्षण शाळा उपक्रमांतर्गत रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी हस्तकला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.आश्रमाच्या चिकूच्या बागेत सकाळी ८.३० ते दुपारी १२ या वेळेत हे प्रशिक्षण होणार आहे.

यात सौ.स्मिता परब या विद्यार्थ्यांना कागदापासून फुले आणि बुके बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत.हा उपक्रम पहिली ते नववीपर्यंतच्याच विद्यार्थ्यांसाठी असून सहभागी होऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३ जानेवारीपर्यंत अर्पिता मुंबरकर, (९४२०२६११९६) यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!