*”प्रत्येकाच्या आयुष्यात स्फूर्ती देणारा राजा शिवछत्रपती माझा”

*”प्रत्येकाच्या आयुष्यात स्फूर्ती देणारा राजा शिवछत्रपती माझा”

*कोकण Express*

*”प्रत्येकाच्या आयुष्यात स्फूर्ती देणारा राजा शिवछत्रपती माझा”*
*-शिवसेना नेते संदेश पारकर*

*शिवजयंती निमित्त खारेपाटणमधे गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेरीत होऊन “प्रत्येकाच्या आयुष्यात स्फूर्ती देणारा राजा शिवछत्रपती माझा” हे घोषवाक्य घेऊन शिवछत्रपतींची प्रेरणा आणि विचार भव्य क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून तळागाळात पोहचवणाऱ्या झुंजार मित्रमंडळाच्या झुंजार मावळ्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. खेळाडूंनी खेळ हे खिलाडू वृत्तीतून खेळावेत. खेळामुळे आपल्या आरोग्य संपत्तीत वाढ होवून चांगल्या आरोग्यासह दिर्घायुष्य मिळते. खेळातून मानवाला जगण्याची नवी उम्मीद मिळत असते. शिवाय खेळामुळे जात-धर्म, गरीब-श्रीमंत अशाप्रकारे भेदभावाला अजिबात थारा दिला जात नाही. खेळामुळे समाजात सलोखा व एकमेकांविषयी आदर निर्माण होतो. खेळात समोरच्या संघातील खेळाडू हा केवळ प्रतिस्पर्धी आहे दुश्मन नाही अशी शिकवणही खेळातून आपल्याला मिळत असते. असे प्रतिपादन शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी खारेपाटण झुंजार मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती दर्शवून केले.*
*खेळ खेळतांना कोणत्याही द्वेशवृतीला थारा देवू नका. आपण एकाच कुटुंबातील आहोत याची जाणीव ठेवा. पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो त्यांच्या निर्णयाचा आदर करा. जिंकलेल्यांचे अभिनंदन करताना हरलेल्यांचे कौतुक करण्याची खिलाडूवृत्ती दाखवा. क्रीडा स्पर्धांचे योगदान लक्षात घेता आपण असे खेळा की ज्याचा भविष्यात आवर्जुन उल्लेख करणे क्रमप्राप्त होईल असे देखील श्री.पारकर यांनी यावेळी सांगितले.*
*याप्रसंगी श्री.संदेश पारकर यांच्यासोबत झुंजार मित्रमंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये, उपाध्यक्ष संजय कोळसुलकर, अँड.हर्षद गावडे, गोट्या कोळसुलकर, शिवाजी राऊत, संतोष गाठे, भुषण कोळसुलकर, तेजस राऊत, आदिनाथ शेट्ये, देवा करांडे, संतोष लोकरे आदी मंडळाचे कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!