*कोंकण एक्सप्रेस*
*मळगाव येथे १८ जानेवारी रोजी स्व.डॉ.सौ.मालती खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा*
*कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरतर्फे आयोजन*
*सावंतवाडी :प्रतिनिधी*
मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने माध्यमिक व प्राथमिक शाळेतील मुलांसाठी १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता स्व.डॉ.सौ.मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ला तालुक्यातील शाळांमधील मुलांसाठी आहे. ही स्पर्धा ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी अशा दोन गटात वाचन मंदिरात होणार आहे. ५ वी ते ७ वी गटासाठी मातृदेवोभव, शिवराय आज असते तर व पुस्तकांच्या सहवासात मी, असे विषय असून यासाठी ४ ते ५ मिनिटे वेळ आहे.
८ वी ते १० वी च्या गटासाठी रतन टाटा – यशाचे दुसरे नाव, सेंद्रिय शेती गरज व महत्त्व, वाचन संस्कृतीचे बदलते रूप आणि आजचा वाचक हे विषय असून यासाठी ५ ते ६ मिनिटे वेळ आहे. वरील तालुक्यातील शाळांनी आपल्या प्रशालेतील मुलांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे,असे आवाहन कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्या वतीने करण्यात आले आहे.