भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली खा.नारायण राणेंनी भेट

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली खा.नारायण राणेंनी भेट

*कोकण Express*

*भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली खा.नारायण राणेंनी भेट*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे,आमदार नितेश राणे यांची भेट घेतली.
एस.एस.पी.एम मेडिकल कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे सिंधुदुर्ग येथे या नेत्यांची भेट झाली.या भेटीत चर्चा काय झाली ? याबाबत कोणतीही माहिती पुढे आली नसली तरी भाजपा राज्यात ताकद वाढविण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यावर वेगवेगळी जबाबदारी देऊन काम करायला सांगितले, असल्याने ते जिल्ह्यात दौऱ्यावर आले असल्याचे समजते.

यावेळी त्यांच्या सोबत शिवदास बिडगर, माऊली हळणवर, सुभाष मस्के, नवलराज काळे आदींसह काही भाजपा नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!