*कोंकण एक्सप्रेस*
*अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण : वाहन चालक संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*
*प्रवासी बसेस मधुन ओव्हरलोड माल वाहतूक : प्रवाशांच्या जीवाशी खेळ*
वेंगुर्ला : प्रतिनिधी*
प्रवासी लक्झरी बस मधून अवैध होत असलेल्या मालवाहतुकीबाबत आर. टी. ओ अधिकारी कुठलीही कार्यवाही करीत नाहीत म्हणून वाहन चालक असोसिएन अध्यक्ष विजय जांभळे यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधले व कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणास बसण्यासाठी निवेदन देण्यात आले.
पुणे ते गोवा चालणाऱ्या बसेस वर गाडीचा डिक्की व कॅरियर वर गाडीची डिक्की व कॅरियर वर प्रमाणापेक्षा अधिक ओवरलोड लगेज वाहतूक केली जाते. या सर्व बसेस खेड, शिवापूर, सातारा, कराड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या सर्व आर. टी. ओ चेक पोस्ट पास करून सिंधुदुर्ग आर. टी. ओ च्या नाकावर टिच्चून गोवा राज्यात प्रवेश करतात. या लगेज वाहतूकमुळे प्रवाशांचा जिवाशी खेळ चालला असून टेम्पो व्यवसाय पण धोक्यात आला आहे.आज टेम्पो चालक मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तसेच १ जानेवारीला भरमसाठ प्रवासी वाहतुकीचे दर असतात, साधारण २५०० ते ३००० पर पेसेंजर दर लावून प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. हे सर्व न थांबल्यास २६ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग आर. टी. ओ विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा असोसिएशन अध्यक्ष विजय जांभळे यांनी दिला आहे.या उपोषणास काही टेम्पो मालक चालक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
अधिक चौकशी केली असता माहिती अधिकारात मागील एका वर्षात आर.टी.ओ.इन्सुली यांनी महिन्याचा १ व २ तारीख ला गाडीचा कॅरियर वर लगेच असेल तर १०००० व फक्त डिक्की मध्ये लगेच असल्यास ४००० रुपयांचा मेमो १ व २ तारीख ला या दोन दिवसात सर्व बसेस ना दिला आहे. व ३ ते ३० तारीख पर्यंत फक्त २०० एन्ट्री घेऊन गाड्या सोडत आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या सर्व प्रकारावर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.या निवेदनाची प्रत.पोलीस अधीक्षक.जिल्हा आर टी ओ.बांदा पोलीस स्टेशन व इन्सुली चेक पोस्ट येथे देण्यात आली आहे.