वडाचापाट येथील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीच्या वार्षिक जत्रौत्सवास १३ जानेवारीपासून प्रारंभ

वडाचापाट येथील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीच्या वार्षिक जत्रौत्सवास १३ जानेवारीपासून प्रारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*वडाचापाट येथील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीच्या वार्षिक जत्रौत्सवास १३ जानेवारीपासून प्रारंभ*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण तालुक्यातील श्री क्षेत्र वडाचापाट ग्रामस्थ आयोजित वडाचापाट गावाची सुप्रसिध्द असणारी,नवसाला पावणारी मानाची स्वयंभू श्री शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रौत्सव पौष पौर्णिमेच्या दिवशी सोमवार, दि. १३ जानेवारी २०२५ ते शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे.

स्वंयभू श्री शांतादुर्गा माऊलीच्या नामाचा जयघोष करीत आई माऊलीचे भरजरी वस्त्रालंकार घालून नटलेले भव्य दिव्य,प्रसन्न अश्या रुपाचे दर्शन हजारो भाविकानी घ्यावे.आईच्या चरणी नतमस्तक व्हावे.श्री स्वयंभू देवी शांतादुर्गा जत्रौत्सवानिमित्त वडाचापाट ग्रामस्थ आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

स्वयंभू श्री देवी शांतादुर्गा जत्रौत्सव २०२५ ,सोमवार, दि. १३ जानेवारी २०२५, सकाळी ८.०० वा. ते दु. १२.३० वा.कलशारोहण वर्धापन दिन आणि महाप्रसाद ,सकाळी १०.०० वा.मोफत औषधांसह सर्व साधारण आरोग्य शिबीर महाराष्ट्र शासन,रात्री ११.०० पूजापाठ व पालखी सोहळा, आईचा गोंधळ (लोकजागर), मंगळवार,दि. १४ जानेवारी २०२५ ,सकाळी १०.०० वा. कृषी प्रदर्शन महाराष्ट्र शासन,सकाळी १०.३० वा. शालेय विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा,दपारी ३.०० स्नेह मेळावा,(हळदीकुंकू समारंभ / विविध स्पर्धा ),रात्री. ९.३० वा.डान्स स्पर्धा.

बुधवार दि. १५ जानेवारी २०२५ ,सकाळी ८.०० वा.श्री दुर्गासप्तशती महायज्ञ व महाप्रसाद,सकाळी१०.०० वा.मोफत औषधांसह सर्व साधारण आरोग्य शिबीर महाराष्ट्र शासन,रात्री ११.०० पूजापाठ व पालखी सोहळा,तद्नंतर प्रोप्रा.चेंदवणकर-गोरे दशावतारी मंडळनिर्मित दहिकाला,गुरूवार, दि. १६ जानेवारी २०२५,दुपारी २.०० गरबा नृत्य (दांडिया रास)स्थानिक ,दुपारी ४.०० संगीत भजन स्पर्धा २०२५,शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२५,सकाळी १०.०० वा.कोकुयो कॅम्लिन पुरस्कृत: शैक्षणिक उपक्रम/स्पर्धा,सायं ७.०० वा. भव्य दीपोत्सव,रात्री ९.०० वा.बक्षिस वितरण समारंभ,रात्री ११.०० पूजापाठ व पालखी सोहळा,उपरोक्त कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन वडाचापाट गाव, थळकरवाडी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!