*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर प्रशालेत ग्रंथ प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी जोपासला वाचन छंद*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला व नगर वाचनालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी भरविण्यात आले.शालेय वयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? यासाठी बाल वयापासूनच वाचनाचा छंद जोपासणे आवश्यक आहे म्हणून सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे प्रदर्शन भरवून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी वाचनातून व्यक्तीमत्व कसे विकसित होते याचे उदाहरणासह स्पष्टीकरण विद्यार्था समोर मांडून वाचन छंद जोपासण्याचे आवाहन केले.शिक्षक पात्रता परीक्षा तलाटी पात्रता परीक्षा ग्रामसेवक भरती परीक्षा एमपीएस युपीएसआयएएस इ.परीक्षेतील पुस्तके प्रदर्शनात मांडून सर्व विद्यार्थ्यांना हाताळण्यास देण्यात आली.या ग्रंथावर अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नगर वाचनालयाचे कार्यवाह पीरखान साहेब,ग्रंथपाल ठाकूर सर,आचार्य मॅडम,शिपाई मुसळे तसेच विद्यामंदिरचे इंग्रजी विषयाचे विलास ठाकूर सर उपस्थित होते.विद्यामंदिर प्रशालेतील पाचशे विद्यार्थांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.