*कोंकण एक्स्प्रेस*
*न्यू इंग्लिश स्कूलअँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचे प्रा. संतोष जोईल यांना राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड प्राप्त*
*कणकवली : प्रतिनिधी*
प्रा. संतोष जोईल यांना राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड प्राप्त दुर्गा फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या तीन राज्यांमधून सामाजिक शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवार्ड देऊन गौरवण्यात येते यावर्षी न्यू इंग्लिश स्कूलअँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट मधील मराठी विषयाचे शिक्षक प्रा. संतोष जोईल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.जोईल सर हे उत्कृष्ट सूत्रसंचालक कवी असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत .यापूर्वीही त्यांना 14 राज्यस्तरीय केंद्रस्तरीय पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी खजिनदार स्कूल कमिटी चेअरमन सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे