सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबच सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लबचे उल्लेखनीय काम-वैभव नाईक

सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबच सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लबचे उल्लेखनीय काम-वैभव नाईक

*कोंकण एक्सप्रेस*

*सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबच सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लबचे उल्लेखनीय काम -वैभव नाईक*

*लायन्स क्लब कुडाळच्या लायन्स फेस्टिवलला मा.आ.वैभव नाईक यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा*

*कुडाळ : प्रतिनिधी*

लायन्स क्लब कुडाळच्या वतीने कुडाळ हायस्कुल मैदान येथे सिंधू लायन्स ऑटो एक्सपो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या लायन्स फेस्टिवलला माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लबचे उल्लेखनीय काम असल्याचे वैभव नाईक यांनी यावेळी सांगत लायन्स क्लबचे आणि सदस्यांचे कौतुक केले.

यावेळी लायन्स क्लबच्या वतीने मा.आ.वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी त्यांनी विविध स्टॉलला भेट दिली.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर,ऍड.अजित भणगे,आनंद बांदिवडेकर,ऍड.अमोल सामंत,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर,सचिन काळप,सुशील चिंदरकर, राजू गवंडे,सागर भोगटे,मंजूनाथ फडके,मेघा सुकी,राम शिरसाट,महेश देसाई, स्वप्नील शिंदे,अमित राणे,लायन्स क्लबचे सदस्य सूरज भोगटे,सागर तेली,आनंद कर्पे,समीर कुलकर्णी,संजीव प्रभू,नयन भणगे,मिहीर भणगे,जीवन बांदेकर,देविका बांदेकर,स्नेहांकित माने,श्रीनिवास नाईक,स्नेहा नाईक,अस्मिता बांदेकर,डॉ. अमुघ चुबे,मिकी तेरसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!