कौशल्य आणि ज्ञानाचा वापर प्रभावीपणे करा : प्रा.वैभव खानोलकर

कौशल्य आणि ज्ञानाचा वापर प्रभावीपणे करा : प्रा.वैभव खानोलकर

*कोंकण एक्सप्रेस*

*कौशल्य आणि ज्ञानाचा वापर प्रभावीपणे करा : प्रा.वैभव खानोलकर*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात नुकतंच राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष मार्गदर्शन वर्गाचं आयोजन करण्यात आले होते. या आयोजन वर्गात खानोली गावचे सुपुत्र आणि खर्डेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विद्यार्थी प्रा. वैभव खानोलकर यांनी विकसित भारतासाठी युवकांचे योगदान या विषयावर मंथन करताना आपल्या कौशल्याचा आपल्या ज्ञानाचा वापर प्रभावीपणे करत देशासाठी काही करता येते का हा प्रयत्न प्रत्येक आजच्या तरुणांनी केला पाहिजे.या वैचारिक मंथनात वैभव खानोलकर यांनी अनेक महापुरुषांची उदाहरणे देत संघर्ष अटळ आहे आणि त्या संघर्ष विरोधामध्ये उभे राहून आपल्यातील कौशल्य ज्ञान, या सोबतच तंत्रज्ञान विकसित करून घेत यांचा वापर देशासाठी करता येईल का याचा विचार आज महत्त्वाचा आहे.

आपल्या विचारातून सध्याची राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले राजकीय लोक ज्याप्रकारे स्वतःची पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी असणाऱ्या विधेयक अगदी दोन मिनिटात विरोधाशिवाय संमत करतात मात्र गोरगरीब जनतेचा सरकारला विचार नसतो आपण जरी लोकशाही देशात राहत असलो तरी या देशांमध्ये अनेक विषय आजही अनुत्तरीत आहेत न्याय मागण्यासाठी न्यायव्यवस्था सुद्धा कितपत न्याय देतील हा आजच्या घडीला प्रश्नच आहे अशा स्थितीत परिवर्तनाची जबाबदारी ही निश्चितपणे युवा वर्गावर आहे हा देश माझा याचे भान मनामध्ये कायम ठेवून आपण जर स्वतःमध्ये सकारात्मक बदल केले आपल्या कौशल्याचा कलेचा वापर करून विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले तर येणारे दिवस हे तुमचेच असतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यांच्या व्याख्यानामध्ये काही प्रेरणादायी कथाही उपस्थित विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवरांना भावणारे ठरल्या वैभव खानोलकर हे दशावतारी लोककला अभ्यासक, एक सुप्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार, उपक्रमशील अध्यापक आदी विविध गोष्टीसाठी प्रसिद्ध असून वैभव खानोलकर हे माझे विद्यार्थी आहेत आणि याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार डॉक्टर पी आर गावडे सर यांनी काढत खानोलकर यांची स्तुती केली.

याचबरोबर प्रा.डॉ. सचिन परूळकर यांच्या कामाचे ही या वेळी कौतुक करत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुमच्या मधूनही समाजाला असेच वैभव खानोलकर आणि सचिन परूळकर मिळो अशी भावना अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. गावडे सर यांनी व्यक्त केली.

मान्यवरांचा परिचय करून देताना डॉ. सचिन परूळकर यांनी महेश राऊळ यांची सर्प मित्र म्हणून प्राणी मित्र म्हणून त्याचबरोबर रक्तदाता म्हणून त्यांची भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडली त्याच बरोबर वैभव खानोलकर यांच्या बद्दलही बोलत असताना प्रचंड यश मिळून सुद्धा जमिनीवर पाय असणारा एक उपक्रमशील शिक्षक या शब्दात खानोलकर यांचे कौतुक केले.

आज विविध स्पर्धांमध्ये न्यू इंग्लिश स्कूलची मुले सातत्याने यश संपादन करताना दिसतात आपल्यातील ज्ञान कौशल्याचे वापर करत खानोलकर सरांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि एक मित्र म्हणून मला ही त्याचा अभिमान असल्याची भावना डॉ. सचिन परूळकर यांनी बोलून दाखवली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!