संतोष देशमुख हत्तेमागील गुन्हेगारांना त्वरित अटक करा अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा

संतोष देशमुख हत्तेमागील गुन्हेगारांना त्वरित अटक करा अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा

*कोंकण एक्सप्रेस*

*संतोष देशमुख हत्तेमागील गुन्हेगारांना त्वरित अटक करा अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा*

*मराठा समाजाची प्रांत कार्यालयावर धडक*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

गुन्हेगाराला कोणती जात,धर्म,पंथ नसतो त्यामुळे संतोष देशमुख हत्ते मागे जे कोण गुन्हेगार असतील त्यांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अन्यथा सकल मराठा समाज उग्र आंदोलन छडेल असा इशारा सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी दिला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निघृणपणे हत्या करण्यात आली, अद्याप मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले व समाजाच्या भावना शासन दरबारी पोहचवाव्यात अशी मागणी केली.

यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे संदिप एकनाथ गावडे, अशोक दळवी, दिनेश गावडे, प्रा सतीश बागवे यांनी त्रीव भावना व्यक्त करत आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी व फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अशी मागणी केली.

यावेळी अशोक दळवी, सुभाष गावडे,पंढरीनाथ राऊळ,अभिमन्यू लोंढे, विश्वास घाग, समीर परब , विलास कुडतरकर, जयसिंग सावंत, सतीश बागवे, भिकाजी धोंड, प्रशांत मोरे, सुंदर गावडे, दयानंद परब , केतन कुमार गावडे, मंगेश सावंत, मनोज घाटकर चंटकांत बिले लक्ष्मण मोरजकर प्रमोद सावंत,अॅड चंद्रशेखर गावडे, राजू तावडे, विनायक सावंत, संजय लाड, नारायण राणे, आकाश मिसाळ, महादेव राऊळ, संदीप गावडे, तारकेश सावंत, देवेंद्र सावंत , नितीन गावडे, नारायण गावडे, आबा सावंत, जगदेव गवस, दीपक गावकर, प्रवीण गुरव, गुलाबराव गावडे , धर्मेंद्र सावंत, रामचंद्र सावंत, संदीप राणे, दिगंबर नाईक, दिनेश गावडे, आदि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!