हिंदुत्वाची तोफ सासवडमध्ये धडाडली

हिंदुत्वाची तोफ सासवडमध्ये धडाडली

*कोंकण एक्सप्रेस*

*हिंदुत्वाची तोफ सासवडमध्ये धडाडली*

*नितेशजी राणे साहेब आक्रमक…!*

*पुणे : प्रतिनिधी*

राज्यात हिंदुत्ववादी विचारांचा सरकार आलेला आहे. कडवट हिंदुत्ववादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसलेले आहेत. त्यामुळे आम्हाला टोकाची भाषणे आणि टोकाचा इशारा देण्याची गरज नसल्याचे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं.
ते पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये बोलत होते.आम्ही जर टोकाचे इशारे दिले तर आम्हाला समाज विचारेल त्यामुळं आता टोकाची भाषणे करायची गरज नाही.

पोलिसांनी निवांत राहिलं तरी चालेल.देशात आणि राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पाळलं जातं.कायदा मोडून आम्हाला मदत करा असे कोणी म्हणणार नसल्याचे नितेशजी राणे म्हणाले.अफजलखानाचा वध करतानाचा फोटो लावू नका.काही लोकांच्या भावना दुखावतील असं मोडक साहेबांना सांगण्यात आलं.

आमच्या राज्यात वधाचा फोटो लावणार नाही तर मग काय पाकिस्तानात लावणार का ? असेही राणे म्हणाले.एवढ्या केसेस अंगावर घेतल्यावर कायद्याचा अभ्यास घ्यावाच लागतो.त्याच्यामुळे आमचा कायद्याचा अभ्यास आहे.जर कायदा असेल तर मी ते पोस्टर काढायला लावतो.

चार दोन लोकांच्या भावना दुखावत असतील तर त्यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जाऊ देत. अनेक लोक तिकडं दाढी करुन कुरवाळत असतात असेही राणे म्हणाले.कत्तलखाने बंद केले पाहिजेतअफजलखानाचा कोथळा काढण्याचा फोटो असलेला बॅनर जर कोणी काढला तर कुणाकुणाचे फोन येतील हे मी सांगणार नाही असेही राणे म्हणाले.

गायीची कोण कत्तल करत असेल तर आम्ही भूमिका घ्यायची नाही? कत्तलखाने बंद केले पाहिजेत असे राणे म्हणाले. आम्ही सरकारमध्ये बसलोत आमचे सीसीटीव्ही सुरु आहेत. कुणाच्या घरी बिर्याणी जाते गोहत्या बंदी कायदा आहे.तर एकही कत्तलखाना सुरू असता कामा नये. आम्ही कत्तलखाने बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असले लाड आमच्या राज्यात चालणार नाहीत असेही राणे म्हणाले.

ज्यांना कायदा पाळायला जमत नसेल त्यांना लाथ मारुन पाकिस्तानात पाठवा. बेकायदेशीर गोष्टीचा समर्थन करणाऱ्याचं समर्थन केलं जाणार नाही.मी फक्त आठवण करुन देण्यासाठी इथं आलोय. कडवट हिंदुत्व सरकार तुमचंच आहे हक्काने किंवाही हाक मारा आणि कोण बेजबाबदार पणे कोण वागत असेल,त्याला सोडले जाणार नाही असा सुचक इशारा दिला आहे.मंत्री असल्याने काही बंधने आहेत.पण तुंम्ही जोमाने काम करा आपलेच सरकार आहे…जय श्री राम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!