कोईळ गावच्या विकासासाठी कटीबद्ध – दत्ता सामंत

कोईळ गावच्या विकासासाठी कटीबद्ध – दत्ता सामंत

*कोंकण एक्सप्रेस*

*कोईळ गावच्या विकासासाठी कटीबद्ध – दत्ता सामंत*

*आचरा : प्रतिनिधी*

कोईळ येथे गणपती मंदिराच्या वर्धापन दिन भाविकांच्या गर्दीत भक्तीमय वातावरणात पार पडला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा कोईळ देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सामंत यांना कोईळ देवस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीने कोईळ गावच्या विकासकामाचे निवेदन देण्यात आले.

एक गाव एक गणपती असलेल्या कोईळ गावाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असून येत्या दोन महिन्यात रस्त्याचे काम मार्गी लावणार असल्याचा सामंत यांनी कोईळ ग्रामस्थांना शब्द दिला. यावेळी तालुका प्रमुख महेश राणे, विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, आचरा सरपंच जॅरॉन फर्नाडिस, प्रफुल्ल प्रभू, शाम साटम, शाखाप्रमुख निलेश साटम, अभिजित सावंत उदय घाडी, भांडे तसेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!