*कोकण Express*
*जानवली नदिपुलानजीक उभ्या वॉगणार कारला टेम्पोची धडक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जानवली पुलानजीक कलेश्वर कॉर्नर इमारतीसमोर उभ्या वॅगनार कारला नांदगाव च्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिली. या अपघातात वॅगणार कारचे नुकसान झाले आहे.
आयशर टेम्पोचालकाने ब्रेक लावल्यानंतर टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या वॅगणार कारला जाऊन धडकला. हा अपघात 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता घडला.