*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड निपाणी राज्य मार्गाची तातडीने दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करणार – संदेश पारकर यांचा इशारा*
*कणकवली : प्रतिनिधी*
देवगड-निपाणी या राज्यमार्गावरील नांदगाव ते फोंडाघाटपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून रस्ता वाहतूकीस धोकादायक झाला आहे. एकीकडे गगनबावडा, भुईबावडा आणि आंबोली हे घाट अवजड वाहतुकीसाठी बंद असताना फोंडाघाटातून अवजड आणि इतर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे.
त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास फोंडाघाट रस्त्यावर स्थानिक नागरिकांसह कोणतीही पूर्व सूचना न देता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन पारकर यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना दिले आहे.