*कोंकण एक्सप्रेस*
*अखेर बोर्डिंग मैदानावरील हायमास्ट टॉवर प्रकाशमान*
*माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी आम. निलेश राणे यांचे लक्ष वेधताच पालिकेची कार्यवाही*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण शहरातील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर नगरपालिकेच्या वतीने बसवण्यात आलेला हायमास्ट टॉवर खाली आणून वर्षभर बंद स्थितीत होता. याबाबत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर हायमास्ट टॉवर पुन्हा उभारून प्रकाशमान करण्याची कार्यवाही नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मालवण शहरातील बोर्डिंग मैदानावर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश असावा या उद्देशाने टोपीवाला हायस्कूलच्या मागणी प्रमाणे तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या कार्यकाळात हायमास्ट टॉवर बसविण्यात आला होत. नेव्ही डे च्या निमित्ताने हा हायमास्ट टॉवर मालवण नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात काढून ठेवला होता. हायमास्ट पुन्हा उभारण्याबाबत कार्यवाही मालवण नगरपरिषदेकडून झाली नसल्याने माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आवाज उठवत नगरपालिका प्रशासनावर टीका केली होती. मात्र त्या नंतरच्या काळातही हायमास्ट टॉवर लावण्याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर हायमास्ट टॉवर पुन्हा उभा करून प्रकाशमान करण्याची कार्यवाही तांत्रिक अडचणी दूर करून नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.