*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे जिल्हा स्तरिय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांकांचे यश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे नुकतेच पार पडले संपूर्ण जिल्ह्यातून नाविण्यपूर्ण विज्ञान प्रयोगांची प्रात्यक्षिके प्रदर्शनासाठी मांडण्यात आली होती विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील प्राथमिक गटामध्ये कुमार ललित सावंत व कुमार गौरेश काडगे यांनी बनविलेल्या Alcohol detection. stearing या प्रतिकृतिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला या विज्ञान प्रतिकृतिची निवड अमरावती येथे होणाऱ्या राज्य स्तरिय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेसाठी झालेली आहे
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक विज्ञान अध्यापक श्री पृथ्वीराज बर्डे सर सौ शर्मिला केळुसकर मॅडमॅ श्री जनार्दन शेळके सर सौ तेली मॅडम यांनी मार्गदर्शन केले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी सर्वांचे अभिनंदन केले . पर्यवेक्षक सौ वृषाली जाधव मॅडम तसेच सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री तवटे साहेब चेअरमन डॉ साळुंखे मॅडम सचिव श्री वळंजू साहेब विश्वस्त श्री डेगवेकर साहेब सर्व संस्था पदाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले .