विज अधिकाऱ्यांना शॉक ट्रीटमेंट भाजपा कार्यकर्ते देतील; आम.नितेश राणे यांचा सज्जड इशारा.

विज अधिकाऱ्यांना शॉक ट्रीटमेंट भाजपा कार्यकर्ते देतील; आम.नितेश राणे यांचा सज्जड इशारा.

*कोकण Express*

*विज अधिकाऱ्यांना शॉक ट्रीटमेंट भाजपा कार्यकर्ते देतील; आम.नितेश राणे यांचा सज्जड इशारा…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा व्यापारी संघाने भेट घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी विजतोडणीबद्दल मला विचारल्याशिवाय विजतोडणी करायची नाही. असा मारलेला डायलॉग फसवा आहे. पालकमंत्र्यांच्या या डायलॉगबाजीनंतरही आज सकाळी सिंधुदुर्गात विजअधिकारी विजतोडणी करत आहेत. पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्र्यांच्या आदेशाला भीक न घालता वीज अधिकारी विजकनेक्शन तोडतायत. अरेरावी करणाऱ्या विजअधिकाऱ्यांना शॉक ट्रीटमेंट भाजपा कार्यकर्ते देतील असा सज्जड इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला.

ठाकरे सरकार कोरोना काळात नुकसानभरपाई देऊ शकले नाही. त्यांचे मंत्रीही जनतेला फसवताहेत. कोरोना काळात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मायकल जॅक्सन च्या शो ची करमाफी ठाकरे सरकार देते मग सामान्य नागरिकांना विजबिलमाफी का देत नाही ? असा संतप्त सवालही आमदार नितेश यांनी उपस्थित केला. मायकल जॅक्सन आणि ठाकरे कुटुंबाला एक न्याय आणि सामान्य जनतेवर अन्याय होत असेल तर आम्ही जनतेच्या बाजूने आवाज उठवणार. दमदाटी करून विजकनेक्शन तोडलात तर वीजअधिकाऱ्यांना कसा शॉक द्यायचा हे भाजपा कार्यकर्त्यांना चांगले माहिती आहे. अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे लागले तर जबाबदार आम्ही नाही. अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला गर्भित इशारा दिला आहे. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती मेघा गांगण, गटनेता संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे,बाबू गायकवाड, ऍड.विराज भोसले, किशोर राणे,बंडू गांगण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!