*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डे कॉलेजच्या कु.रिद्धी पाळेकरचे यश*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वैभववाडी पुरस्कृत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डे ज्यु. कॉलेजची कु.रिद्धी पाळेकर हिच्या निबंधाने महाविद्यालयीन गटात द्वितीय स्थान पटकाविले आहे.
२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कु.रिद्धी पाळेकर हिने ‘ग्राहक म्हणून माझी अपेक्षा’ या विषयावर निबंध सादर केला होता.ग्राहक पंचायत महाराष्ट्र कणकवली शाखेचे सहसचिव प्रा.विनायक पाताडे व मराठी विभागातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
कु.रिद्धी पाळेकरचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे व संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालय पालक-शिक्षक संघ आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी.बी.बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राज्य सहसचिव व जिल्हाध्यक्ष एस. एन. पाटील यांनी अभिनंदन केले.