*कोंकण एक्सप्रेस*
*कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी*
*बबली राणेंनी दाखवून दिले समाजकार्याला जिल्हा किंवा राज्याच्या सीमेचे बंधन नसते*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील ओसरगाव गावचे माजी सरपंच बबली राणे हे सध्या आंध्रप्रदेश,तेलंगणा व ओरिसा राज्याच्या दौऱ्यावर आहेत.नवीन वर्ष साजरं करण्यासाठी ते विशाखापट्टणम येथे गेले असता तेथे फिरत असताना त्यांना एका ब्रिजच्या खाली निराधार बेघर वयोवृद्ध माणसे प्रचंड थंडीच्या वातावरणात झोपलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली.
बबली राणे यांनी हे पाहून क्षणाचा विलंब न लावता तेथीलच एका दुकानातून वीस ब्लॅंकेट्स आणि चादरी घेऊन त्यांना भेट दिली.कोकणी माणसं मनाने किती हळवी असतात हे त्यांनी दाखवून दिले.जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी समाजकार्य हे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहील.समाजकार्य करायला आपला गाव आपला जिल्हा आपला राज्य पाहिजे असे काही नाही असे बबली राणे यांनी सांगितले.