मंदार केणींनी घेतलाय मालवणातील उरली सुरली उबाठा संपवण्याचा विडा – शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांची टीका

मंदार केणींनी घेतलाय मालवणातील उरली सुरली उबाठा संपवण्याचा विडा – शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांची टीका

*कोंकण एक्सप्रेस*

*मंदार केणींनी घेतलाय मालवणातील उरली सुरली उबाठा संपवण्याचा विडा – शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांची टीका*

*मालवण : प्रतिनिधी*

चिपी विमानतळ, पर्यटन महोत्सव यांसारख्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्यावर शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी हल्लाबोल केला आहे.एका वाचाळवीराने रोज सकाळी उठुन तोंडाची बडबड करून पक्ष संपवला आणि हे दुसरे वाचाळवीर मंदार केणी यांनी मालवणातली उरलीसुरली उबाठा संपवायचा विडा उचलला आहे, असे सांगून वैभव नाईकांना आमदारकीच्या १० वर्षात जे शक्य झालं नाही, ती कामे निलेश राणे नक्कीच करतील.सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे.त्यामुळे आता पर्यटन महोत्सव आयोजित करण्याची गरज नाही.महोत्सव घ्यायचाच असेल तर येत्या एप्रिल – मे महिन्यात हा महोत्सव साजरा केला जाईल,तसेच चिपी – मुंबई विमानसेवा लवकरच सुरु करून मंदार केणींना त्याच विमानाने मुंबईला पाठवण्याची व्यवस्था करू,असा टोला राजा गावकर यांनी लगावला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री.गावकर यांनी म्हटले आहे की, वैभव नाईक हे १० वर्ष आमदार होते.त्यांच्या हातात सत्ता होती. काय केलं आमदारांनी…? लोकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकले नाहीत. मालवण शहराच्या दुरावस्थेला संपूर्णपणे आमदार वैभव नाईक हेच जबाबदार आहेत. मालवण शहरातील सरकारी दवाखान्याच्या दुरावस्थेसाठीही आमदार वैभव नाईकच जबाबदार आहेत. मालवणातील जनतेने मालवण नगरपालिका आमदार वैभव नाईक यांच्या ताब्यात दिली पण तुम्ही काय केले ? विकासाच धोरणच तुम्हाला ठरवता येत नसेल तर तुम्ही विकास काय करणार? विकासाच्या नावाखाली मालवण नगरपालिकेची जी दुरावस्था झाली त्यालाही जबाबदार आमदार वैभव नाईकच आहेत.कचऱ्याचे नियोजन नाही, भाजी मार्केटची अर्धवट राहिलेली वास्तू त्यात कंपाऊंडला लावलेले पत्र्यांचे कंपाऊंड तोडून अतिक्रमण करू देणारे त्यावेळचे बांधकाम सभापती कोण? आणखी याला जबाबदार कोण…? दहा वर्षात मालवणसाठी कोणते विकासात्मक काम केलं हे दाखवून द्यावं…! मालवण एसटी स्टँडचेही अर्धवट राहिलेले काम हेही त्यातलेच एक उत्तम उदाहरण आहे असेही गावकर यांनी म

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!