*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर*
*रमेश जोगळे यांना ज्येष्ठ आदर्श पत्रकार पुरस्कार*
*वैभव साळसकर,दत्तप्रसाद वालावलकर,कृष्णा ढोलम,सचिन लळीत,भरत सातोसकर,हरिश्चंद्र पवार,मारुती कांबळे पुरस्काराचे मानकरी*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.या बैठकीत एक ज्येष्ठ व सात आदर्श पत्रकार पुरस्कारांची निवड करण्यात आली.६ जानेवारीला होणाऱ्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी दिली.
यात कणकवली मधून रमेश जोगळे यांना ज्येष्ठ आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला. दोडामार्ग मधून वैभव साळसकर, सिंधुदुर्गनगरी मधून दत्तप्रसाद वालावलकर, मालवण मधून कृष्णा ढोलम, देवगड सचिन लळीत, वेंगुर्ले भरत सातोसकर, सावंतवाडी मधून हरिश्चंद्र पवार, कुडाळ मधून वैभववाडी मधून मारुती कांबळे यांची जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी बैठकीत आदर्श पुरस्कारासाठी निवड झाली. आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ही निवड झाली.
यावेळी गणेश जेठे, बाळ खडपकर, संतोष सावंत, संतोष राऊळ, बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर, प्रवीण मांजरेकर, लवू महाडेश्वर, महेंद्र मातोंडकर, अमित खोत, लक्ष्मीकांत भावे, राजन नाईक, किशोर जैतापकर, प्रशांत वाडेकर व सुहास देसाई आदी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांनी ही आदर्श पत्रकार पुरस्कार निवड केली.
६ जानेवारीला पत्रकार दिनाचा जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे,प्रमुख वक्ते माधव भंडारी, जिल्हाधिकारी अनिल पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल मान्यवरांच्या उपस्थितीत व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.
यावेळी गणेश जेठे,बाळ खडपकर,संतोष सावंत,संतोष राऊळ,बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर, प्रवीण मांजरेकर, लवू महाडेश्वर, महेंद्र मातोंडकर, अमित खोत, लक्ष्मीकांत भावे, राजन नाईक, किशोर जैतापकर, प्रशांत वाडेकर व सुहास देसाई आदी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांनी ही आदर्श पत्रकार पुरस्कार निवड केली. या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी, पत्रकार हितचिंतकानी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाने केले आहे.