*कोंकण एक्सप्रेस*
*२९ डिसेंबरला कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशनच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशनचे स्नेहसंमेलन व वार्षिक सर्वसाधारण रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल रॉयल सिटी इन, मुंबई गोवा हायवे, सारस्वस्त बँकेचे मागे तळमजला, कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या स्नेहसंमेलनात ७५ वर्षावरील सभासदांचा सत्कार, मान्यवरांची मनोगते व मार्गदर्शन होणार आहे. स्नेहसंमेलनात मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील पेन्शनर सदस्यांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.