कुडाळ येथे आंबापीक शेतीशाळा संपन्न

कुडाळ येथे आंबापीक शेतीशाळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळ येथे आंबापीक शेतीशाळा संपन्न*

*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*

महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) “आंबा पिक” सन २०२४-२५ अंतर्गत, कुडाळ तालुक्यातील गांधीनगर गावी आंबा पिकाची शेतीशाळा संपन्न झाली. या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील डॉ. गोपाळ गोळवणकर कीटकशास्त्रज्ञ व हॉर्टसॅप संशोधन सहयोगी, श्रीम. एस. एस. कविठकर कृषि पर्यवेक्षक, सोमकांत आईर कृषि सेवक, समीर धुरी पाट परबवाडा उपसरपंच व सहदेव प्रभू ग्रा.पं. सदस्य हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्रीम. एस. एस. कविठकर यांनी या शेतीशाळेचा उद्देश व महत्व अधोरीखित केले व शेतकऱ्यांना आंबा पिकाबाबत शेतमाल साठवणूक, विक्री व काढणीपश्यात प्रकिया उद्योग केंद्र शासन सहाय्यित पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची विस्तृत माहिती दिली. या शेतीशाळेच्या तांत्रिक सत्रात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ गोपाळ गोळवणकर यांनी आंबा पिकावरील कीड-रोगांची ओळख व नियंत्रण, मोहोर संरक्षण, बदलते हवामान व त्यानुसार करावयाच्या उपाययोजना, कीड-रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, फवारणीचे तंत्र व कीटकनाशकांचा गरजेनुसार वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी त्यांच्या आंबा बागेत येणाऱ्या समस्या विचारून त्यावर सखोल चर्चा केली. या शेतीशाळेत २५ आंबा शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषि सेवक सोमनाथ आईर यांनी केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!