बांद्यात विना मास्क फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

बांद्यात विना मास्क फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

*कोकण Express*

*बांद्यात विना मास्क फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई*

*बांदा ः प्रतिनिधी*

राज्यात परत एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने सर्वत्र पुन्हा एकदा कोरोना नियमावली लागू करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार जिल्ह्यात कारवाईला सुरुवात झाली आहे.सोमवारी बांद्यातही आठवडा बाजारात विनामास्क फिरणाऱ्यांवर बांदा ग्रामपंचायत आणि पोलिसांच्या सहकार्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.त्यामुळे बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.कट्टा कॉर्नर येथे कारवाई होत असल्याचे लक्षात येताच विनामास्क आलेल्या लोकांनी मास्क खरेदी करून दंडात्मक कारवाई पासून वाचण्याचा प्रयत्न सुरू केला.कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही.लस येऊनही कोरोना पुन्हा राज्यात हातपाय पसरू लागल्याने आता कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या कोरोनापासून स्वतःबरोबर कुटुंबाचाही बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!