*कोंकण एक्स्प्रेस*
*निगुडे गावचे ग्रामदैवत श्रीदेवी माऊली पालखी तरंगकाठी संपूर्ण गावामध्ये फिरवून आज अखेर सांगता*
*बांदा : प्रतिनिधी*
निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पुनः प्रतिष्ठापन कार्यक्रम ३० जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे.तरी गावातील घरोघरी या प्रतिष्ठापनेच निमंत्रण देण्याकरिता श्री देवी माऊलीची पालखी आणि तरंगकाठी सोमवार दिनांक २३ डिसेंबर २०२४ ते आज २७ डिसेंबर पासून पाच दिवस संपूर्ण देव कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याकरिता गावामध्ये रवाना झाले होते.
चार दिवस गावातच वस्तीला होते.गावांमध्ये कोणतंही विघ्न न येता भक्तिमय वातावरणात घरोघरी श्री च्या पालखीची सर्व ग्रामस्थांना पूजाअर्चा केली व काहीजणांचे नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम गेले पाच दिवस संपूर्ण गावांमध्ये रांगोळी घालून पूजा अर्चा करण्यात आली यावेळी निगुडे कासकरटेंब, आरोसकरटेंब, नवीन देऊळवाडी, दुरेकरवाडी, राणेवाडी, मधलीवाडी, गजनेवाडी, पाटीलवाडी, तेलवाडी, जुनीदेऊळवाडी, गावठणकरवाडी आदी वाडी मध्ये देव आपल्या तरंगाठी पालखी सही गाठीभेटी घरोघरी देत फिरत होते.
भक्तिमय वातावरणात संपूर्ण गाव आनंदी उत्साहात होता.आज सायंकाळी चार वाजता निगुडे चव्हाटा या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व त्यानंतर श्रींची पालखी व तरंगगाठी श्री देवी माऊली मंदिराच्या दिशेने रवाना झाली यावेळी देवस्थानचे प्रमुख मानकरी श्री शांताराम गावडे, पांडुरंग गावडे, महेंद्र गावडे, नाना खडपकर, देवस्थान समितीचे सचिव गुरुदास गवंडे , तसेच ग्रामस्थ सर्वेश गावडे, विलास सावंत, जनार्दन पवार, सुधीर गावडे, संजय मेस्त्री, शंकर निगुडकर, नामदेव राऊळ, गुरुदास निगुडकर, महादेव जाधव, नरेंद्र पवार, विशाल गावडे, सचिन निगुडकर, नारायण गवंडे, राजन निरगुडकर, बाबू निगुडकर असे अनेक ग्रामस्थ भाविक उपस्थित होते.