गड किल्ले संवर्धन संस्थेचा विजयदुर्ग किल्ल्यावर ऐतिहासिक सोहळा

गड किल्ले संवर्धन संस्थेचा विजयदुर्ग किल्ल्यावर ऐतिहासिक सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*गड किल्ले संवर्धन संस्थेचा विजयदुर्ग किल्ल्यावर ऐतिहासिक सोहळा*

*राजकीय तसेच इतिहासकालीन वारसदारांची उपस्थिती*

*विजयदुर्ग : प्रतिनिधी*

गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्यावर २८ आणि २९ डिसेंबर दोन दिवस भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.किल्ले विजयदुर्ग येथे हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे.यानिमित्ताने शनिवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत शिवप्रभूच्या पराक्रमावर काव्यात्मक शिवचरित्र रचणारे कवी भूषण यांच्या छंदात्मक काव्य रचनांचे सादरीकरण भूषण साटम करणार आहेत.

दरम्यान,रविवारी 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत शिवव्याख्याते ओंकार यादव यांचे छत्रपतींच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले आहे.या कार्यक्रमासाठी 29 डिसेंबर रोजी खासदार नारायणराव राणे, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, आमदार निलेश राणे, विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी मनोज सोनवलकर, राज्य पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सहाय्यक निरीक्षक विलास वाहणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन काम करणारे अनेक अतिथी तसेच सन्मानार्थी संस्था आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

विजयदुर्ग किल्ल्याच्या इतिहासात अनेकांनी आपले योगदान दिले. याची जाणीव आजही विजयदुर्ग ग्रामस्थांना तसेच गड किल्ले संवर्धन संस्थेला आहे. त्यामुळे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणालदादा मालुसरे, हिरोजी इंदलकर यांचे वंशज सरदार समीरराजे इंदलकर, धाराऊमाता गाडे यांचे वंशज सरनोबत अमितदादा गाडे पाटील, महाराणी येसुत वंशज श्रीमंत दीपकराजे शिर्के, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच

विजयदुर्ग किल्ल्याच्या इतिहासात अनेकांनी आपले योगदान दिले. याची जाणीव आजही विजयदुर्ग ग्रामस्थांना तसेच गड किल्ले संवर्धन संस्थेला आहे. त्यामुळे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणालदादा मालुसरे, हिरोजी इंदलकर यांचे वंशज सरदार समीरराजे इंदलकर, धाराऊमाता गाडे यांचे वंशज सरनोबत अमितदादा गाडे पाटील, महाराणी येसुबाई यांचे वंशज श्रीमंत दीपकराजे शिर्के, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सरसेनापती राजेंद्र मोहिते पाटील तसेच गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट, महाराष्ट्राचे विश्वस्त सचिनदादा भोसले पाटील आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी 50 हजारांची देणगी दिली असून गड किल्ले संवर्धन संस्थेच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. गड किल्ले संवर्धन संस्था आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्याबद्दल विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच रियाज काझी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!