विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताह उत्साहात साजरा

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताह उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताह उत्साहात साजरा*

*कणकवली : प्रतिनिधी*

महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कणकवली व विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक सप्ताह साजरा करण्यात आला.या निमित्ताने रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,भित्तीपत्रिका,निबंध लेखन व परिसंवाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा ठेवण्यात आल्या.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सर यांनी ग्राहक पंचायत व कायदे या विषयी मार्गदर्शन केले.

कामगार केंद्राचे प्रमुख श्री नेवरेकर साहेब यांनी कामगार आणि शिष्यवृत्ती योजना या विषयी माहिती सांगून ग्राहकांची फसवणूक कशी होते आणि उपाय योजना याची माहिती कथन केली.या वेळी पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम श्री संदिप कदम सर श्री विलासराव ठाकूर सर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!