*कोकण Express*
*वीज कनेक्शन कट न करण्याबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचना द्या…*
*शिवसेना नेते संदेश पारकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वीज ग्राहकांना नाहक त्रास देऊ नका. पालकमंत्र्यांनी वीज ग्राहकांच्या थकीत रक्कमेपोटी हप्त्याने पैसे भरून घ्या, पण वीज कनेक्शन कट न करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्यास्तरावरून सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना याबाबत तातडीने सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने महावितरणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता गिरीष भगत यांची भेट घेऊन केली.
शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख शैलेश भागले , माजी सभापती संदेश पटेल , राजू राठोड , महेश कोदे , रश्मी बाणे , तिवरे सरपंच श्रीमती म्हाडेश्वर , जगन्नाथ आजगांवकर , सुनिल हरमळकर , संदीप जाधव व इतरांनी श्री . भगत यांची भेट घेऊन चर्चा केली . श्री . पारकर म्हणाले , ग्राहकांना विजबिले मोठ्या प्रमाणात आलेली आहेत . थकीत विजबिले वसूलीसाठी मोहित काढून कनेक्शन कट केले जात आहे . याबाबत पालकमंत्र्यांनी आदेश देत कट न करण्याच्या दिलेल्या सूचनांची क्षेत्रीय पातळंवर तातडीने कळवून कनेक्शन कट करू नका . जे ग्राहक हप्त्याने रक्कम भरायला तयार आहेत , त्यांना त्यापद्धतीने हप्ते ठरवून द्या , अशी मागणी करण्यात आली . याबाबत अधिक्षक अभियंत्यांसाबतही दुरध्वनीवरून चर्चा करण्यात आली . त्यांनीही पालकमंत्र्यांच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगितले . तसेच ज्यांना पुर्ण रक्कम भरणे शक्य आहेत , त्यांनी भरावी , असे आवाहनही केले. यावेळी येथील महावितरणच्या कार्यालयात बिल भरण्यासाठीचे सेंटर सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. याबाबत आपण कार्यकारी अभियंत्यांना सूचना करतो , असे अधिक्षक अभियंता श्री . पाटील यांनी स्पष्ट केले.