*कोंकण एक्सप्रेस*
*महावितरणच्या अजब कारभारामुळे पत्रकार मदन मुरकर यांचा अपघात……!*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
महावितरणच्या जीर्ण झालेल्या वायर (केबल) रस्त्यांनजीकच टाकून दिल्या जात आहेत.विद्युत वाहिन्यांना सपोर्ट देण्यासाठी लावण्यात येणाऱ्या गंज आलेल्या वायरी काढून तिथेच टाकल्या जातात.मात्र याचा त्रास बऱ्याच ठिकाणी ग्रामस्थांना,पादचाऱ्यांना व वाहनधारकांना होत असतो.याचाच प्रत्यय मळेवाड येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक श्री.मदन मुरकर साहेब या वाहन चालकाला आला.
मुरकर हे मळेवाड वरून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना, पेंडुर घोडेमुखं ग्रामपंचायत जवळील मुख्य रस्त्यावर या विद्युत वाहिन्यांना सपोर्ट देणारी वायर काढून रस्त्याच्या बाजूलाच टाकली होती. गुरांच्या ये – जा मुळे ही वायर रस्त्यावर आली.अचानक या रस्त्यावरून जाताना ही टाकलेली वायर दुचाकीच्या टायर मध्ये अडकून गाडी ला गुंडाळली त्यामुळे गाडी स्लीप होऊन मुरकर हे जखमी होऊन त्यांना दुखापत झाली.
काही ठिकाणी तर हे जीर्ण झालेले विद्युत पोल,टाकाऊ तारा,वायर ,विद्युत वाहिन्यांवर वाढलेली झाडी, या कडे या विद्युत विभागाचा दुर्लक्ष च दिसत आहे.सगळीकडे या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे.मात्र याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी ह्या पडलेल्या वायर बाजूला करून मुरकर यांना अधिक उपचारासाठी डॉक्टर कडे नेले.
सावंतवाडी ते शिरोडा महामार्गांवरील पेंडुर ( घोडेमुख ) दरम्यान अशा प्रकारच्या तुटलेल्या विद्युत तारा व विद्युत खांब मोडलेले असतील तर महावितरणने वेळीच जागे व्हायला हवे.कारण आज घडलेल्या प्रकाराप्रमाणे बस चालक ,कामानिमित्त ये – जा करणारे मोटार चालक व धंदेवाईक यांच्याबाबत अशी घटना घडली आणि कोणाच्या जीवावर बेतले तर त्याला सर्वस्वी सिंधुदुर्ग जिल्हा व वेंगुर्ला तालुका मधील विद्युत अधिकारी जबाबदार राहितील असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.