*कोंकण एक्सप्रेस*
*अर्चना सावंत यांना राज्यस्तरीय सिंधुदुर्ग शिक्षण गौरव पुरस्कार*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाच्या इंग्रजी विषय शिक्षिका अर्चना सावंत यांना हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी कराड या संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय सिंधुदुर्ग शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सौ सावंत या गेली 25 वर्ष विनाअनुदानित तत्त्वावरील शाळेत इंग्रजी विषय शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्या सध्या टप्पा अनुदान तत्त्वावर काम करत आहेत. एम ए, बी एड पदवी प्राप्त असून कायदेविषयक ज्ञान त्यांनी घेतले आहे. वकिलीक्षेत्राची पदवी परीक्षा त्या उत्तीर्ण मराठी एमए शिक्षण ही पूर्ण केले आहे. त्यांच्या
घेतले आहे. वकिलीक्षेत्राची पदवी परीक्षा त्या उत्तीर्ण आहेत मराठी एमए शिक्षण ही पूर्ण केले आहे. त्यांच्या एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या संस्थेमार्फत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचीही निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.