कुडाळात भाजी विक्री करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

कुडाळात भाजी विक्री करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळात भाजी विक्री करणाऱ्या तरुणाची आत्महत्या*

*कुडाळ : प्रतिनिधी*

कुडाळ शहरातील मारुती मंदिर येथे राहणारे भाजी व्यावसायिक शिवा कृष्णा नायक व 28 यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली पत्नी व दोन मुले घरात झोपली असताना शिवा नायक यांनी आत्महत्या केली शिवा नायक कुडाळ मारुती मंदिर येथे एका चाळीत भाड्याने राहत होते.

ते राहत असलेले घर दोन खोल्यांचे आहे.दरम्यान बुधवारी रात्री पत्नी व मुले झोपली असताना ते किचन रूम मध्ये गेले व तेथील लोखंडीबाराला साडीने गळफास लावत आत्महत्या केली.पत्नी दोन वाजता उठून किचनमध्ये गेल्यावर तिलाही घटना निदर्शनास आली यानंतर तिने शेजाऱ्यांना माहिती दिली. कुडाळ पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्यावर पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर पोलीस सचिन गवस महेश भोई यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

शिवा नायक यांचे मूळ गाव विजापूर कर्नाटक येथे असून ते गेले काही दिवस कुडाळमध्ये भाजीचा व्यवसाय करत होते. मात्र यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस श्री परुळेकर करत असून घटनेची फिर्याद सौ सिता शंकर राठोड राहणार कुडाळ आंबेडकरनगर यांनी पोलिसात दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!