*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार निलेश राणे यांनी मांडला मालवण शहराचा ‘ऍक्शन प्लॅन’!*
*पहिल्याच आढावा बैठकीत मांडल्या एक ना अनेक संकल्पना*
*मालवण : प्रतिनिधी*
कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी सकाळी मालवण नगरपरिषदेच्या विकासात्मक कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी मालवण शहराच्या विकासात्मक बाबींवर आ. निलेश राणे यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेले या बैठकीत पाहायला मिळाले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेत देण्यात यावे.त्याबाबतीत कंत्राटदार ला सक्त ताकीद देण्यात यावी.वेळेत पेमेंट न दिल्यास कंत्राटदारांना सोडणार नाही.पथदिवे आणि हायमास्ट टॉवर सर्व सुरु राहिले पाहिजेत.कर वाढवू नका.कराचा बोजा सर्वसामान्य मालवणवासियांवर नको.कराचा बोजा वाढवण्यापेक्षा नगरपरिषदेचे उत्पन्न वाढवा. पर्यटक भेटी देऊ शकतील अशा काही वास्तू उभ्या कराव्यात पर्यटक भेटी देऊ शकतील अशा काही वास्तू उभ्या कराव्यात, त्याबाबतचे प्रस्ताव तयार करावेत,अशा सूचना आ. निलेश राणे यांनी दिल्यात.
महिला बचत गटांच्या सक्षमी करणाकरता तयार झालेल्या उत्पादनाची विक्री होण्यासाठी वितरक नेमणूक करावेत. वितरक देण्याची जबाबदारी माझी असून यातून महिला बचत गटांच्या उत्पादनाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास आ.निलेश राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मालवण शहरात कचरा व्यवस्थापनाची अद्ययावत प्रक्रिया उभी करूयात. तसेच वाढीव स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी प्रस्ताव पाठवावा अशी सूचनाही केली.
नगरोत्थान निधी अवघा 9 कोटी चा येतो.मालवण हे पर्यटन क्षेत्र असल्याने नगरोत्थान मधून प्रथम 20 कोटीच्या वर प्रस्ताव तयार करा. नगरोत्थान मधून मालवण शहराला अधिक निधी मिळण ही शहराची गरज आहे.