*कोंकण एक्सप्रेस*
*२९ डिसेंबरला प.पू.भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा*
*कणकवली कॉलेज आणि कळसुलकर हाय.सावंतवाडी केंद्र*
*कणकवली : प्रतिनिधी*
परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) व पूर्व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती सराव परीक्षा रविवार २९ डिसेंबर रोजी कणकवली कॉलेज व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या दोन केंद्रावर संपन्न होणार आहे.
विद्यार्थी बैठक क्रमांक परीक्षे दिवशी परीक्षा केंद्रावर लावण्यात येणार असून ते आडनाव अल्फाबेटिक क्रमांकानुसार असून मराठी व इंग्रजी माध्यम स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे.
पहिला पेपर प्रथम भाषा (मराठी किंवा इंग्रजी) व गणित असून दुसरा पेपर द्वितीय भाषा व बुध्दिमत्ता असणार आहे. पेपर १ हा ११ ते १२.३० वा. व पेपर २ हा १.३० ते ३ या वेळात होणार आहे याची प्रविष्ट विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. पहिल्या पेपरला प्रविष्ट विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० वाजता परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. परिक्षेवेळी प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेतलेल्याच विद्यार्थ्यांन परीक्षेस बसता येईल. परीक्षेदिवशी अन्य विद्यार्थ्यांना आयत्यावेळे प्रवेश दिला जाणार नाही.परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी वेळीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे,असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थान व शैक्षणिक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.