*कोंकण एक्सप्रेस*
*साटेली भेडशी येथील कृष्णा मयेकर या तरुणाचा आगीत गुदमरून दुदैवी मृत्यू*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
भेडशी सुतारवाडी येथील विवाहित तरुण कृष्णा उर्फ गिरी गोपाळ मयेकर, वय वर्षे ५२ या तरुणाचा शेतात गवत जाळण्यासाठी घातलेल्या आगीत आगीत गुदमरून दुदैवी मृत्यू होण्याची दुदैवी घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
तो दुपारी घरी न आल्याने सायंकाळी पाच वाजता शोध घेण्यासाठी काही नातेवाईक गेले असता तो मृत अवस्थेत आढळून आला याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उशीरा पर्यंत पंचनामा सुरू होता कृष्णा मयेकर याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.