*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय,सिंधुदुर्गचा संतसेवा पुरस्कार २०२४ जाहीर*
*ह.भ.प.रमाकांत गायकवाड (फोंडा) हे पुरस्काराचे मानकरी*
*कणकवली : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चे मानाचा संतसेवा पुरस्कार २०२४ नुकतेच जाहीर करण्यात आले.यावर्षी ह.भ.प.रमाकांत गायकवाड (फोंडा कणकवली) व तायाराम रामचंद्र गुरव (नर्ले वैभववाडी)यांना जाहीर करण्यात आले.वारकरी संप्रदायात हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे व मानाचे समजले जातात. गेली ११ वर्षे सातत्याने हे पुरस्कार जिल्ह्यातील जेष्ठ कीर्तनकार, मृदंगमनी, प्रवचनकार यांना देण्यात येत आहे.रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या वारकरी जिल्हा मेळाव्यात हे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग च्या पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. याबैठकीस जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर,खजिनदार मधुकर प्रभुगावकर,सचिव राजू राणे, गणपत घाडीगांवकर, प्रकाश सावंत, कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, संतोष राऊळ हे उपस्थित होते.
रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर,यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सभागृह कणकवली येथे होणाऱ्या वारकरी जिल्हा मेळाव्यास जिल्ह्यातील विठ्ठल भक्त, भाविक, तसेच वारकरी बंधुभागिनी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या वारकरी दिंडीसही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हासचिव मा.राजू राणे यांनी केले आहे.