*कोंकण एक्सप्रेस*
*संदिप मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त २७ डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कलमठ गावचे लोकप्रिय सरपंच मान श्री.संदिप मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दि. २७ डिसेंबर २०२४ सकाळी ९.०० ते १ .०० वाजता श्री काशिकलेश्वर सभागृह, ग्रामपंचायत कलमठ याठिकाणी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदानाचे अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन संदिप मेस्त्री मित्रमंडळ कलमठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.