*कोंकण एक्सप्रेस*
*हेवाळे गावात टस्कर हत्तीचा हैदोस सुरूच*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
हेवाळे गावात दाखल झालेल्या जंगली टस्कर हत्तीचा हैदोस सुरूच असून नुकसान सत्र सुरूच आहे.यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. जंगली टस्कर हत्ती लोकवस्ती मध्ये येऊ नये,नुकसान करु नये यासाठी मंगळवारी रात्री हेवाळे गावात वन कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ हत्तीला हुसकावून लावण्यासाठी थांबले होते.
मात्र तरीही टस्कर हत्ती दाखल झाला.त्याने येथील दत्ताराम देसाई यांच्या घराशेजारी असलेला भेडला माड पाडून त्याचा फडशा पाडला.आरडाओरडा करत फटाके लावून त्याला हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.मात्र तरीही हा टस्कर हत्ती काही मिनिटे तेथेच होता.सुदैवाने माड घरावर टाकला नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून लवकरात लवकर या हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.