*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत आरपीडीचे वर्चस्व*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी यांच्या वतीने प.पू.सानेगुरुजी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कै.दत्ताराम कृ.वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धा स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज सावंतवाडी प्रशालेने वर्चस्व राखले आहे.
मोठ्या गटात कु.मृणाली मोहन पवार (आठवी) हिने प्रथम क्रमांक तर कु.प्रणाली राजन घाटकर (आठवी) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.तसेच लहान गटात आर्यन चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
या तिहेरी यशस्वीतेसाठी व आरपीडी प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल मृणाली, प्रणाली व आर्यन यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, प्र. मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक एस. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, तसेच पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.